अक्षय्य तृतीया  मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

नांदेड, बातमी24:-अक्षय तृतीयेच्या  मुहूर्तावर शहरासह ग्रामीण भागात बालविवाह लावण्याची काही ठिकाणी पद्धत असते. याला आळा घालण्यासाठी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. बालविवाह हा अजामीन पात्र गुन्हा आहे. अशा विवाहांना आळा घालण्यासाठी व कायदेशिर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता व योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती जिल्हाधिकरी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली. बालविवाह […]

आणखी वाचा..

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त नांदेड शहरात भव्य मिरवणुकीसह सभेचे आयोजन

नांदेड,बातमी24:-क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती नांदेड शहरात प्रतिवर्षी शिवा संघटनेच्यावतीने अक्षय तृतीया च्या दिवशी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले जाते. मिरवणुकीची सांगता जहिरसभेने होणार आहे. शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर यांच्या 891 व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे .ही भव्य मिरवणूक […]

आणखी वाचा..

ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा परिषदेचे अमूल्य योगदान:-पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,बातमी24:- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून पंचायतराज व्यवस्थेला दूरदृष्टी मिळाली. ग्रामपंचायतीमध्ये लोक सहभागाचे महत्व अधोरेखित झाले. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रीयेमुळे ग्रामपंचायती आणि स्वराज्य संस्था बळकट झाल्या. लोकशाही व्यवस्थेत गाव पातळीवरील विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीचे अमुल्य योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. जिल्हा परिषद […]

आणखी वाचा..

समतेचा समृद्व वारसा जपण्यातच सर्वांचे हित:-  पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,बातमी24 :- महाराष्ट्राला ऐतिहासिक, भौगोलिक,वैचारिक, सामाजिक सुधारणेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. गत दोन हजार वर्षांच्या काळात या भूमीने आपल्या  कष्टाच्या बळावर विविध क्षेत्रात अपूर्व ठसा उमटविला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन रयतेला जाणता राजाची प्रचिती दिली.  महाराष्ट्राला एका बाजुला शौर्याचा स्फुर्तीदायी वारसा तर दुसऱ्या बाजुला संत, महात्म्यांच्या समतेचा, प्रबोधनाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा समतेचा वारसा जपण्यातच महाराष्ट्राचे हित आहे असे प्रतिपादन […]

आणखी वाचा..

सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांचा पदक देऊन सन्मान

नांदेड, बातमी24:-नांदेड पोलीस दलातील कर्तव्यदक्ष तथा धडाडीचे पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांना महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले होते.आज महाराष्ट्र दिनी भारती यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पाकलमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पदक देऊन गौरव करण्यात आला. मागील चार […]

आणखी वाचा..

स्मार्ट व्हिलेज करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा:सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:- भोकर तालुक्यात स्मार्ट व्हिलेज अंतर्गत अनेक गावात उत्कृष्ट काम होत आहेत. यामुळे गावांचा कायापालट होताना दिसून येतो. यापुढे स्मार्ट व्हिलेज म्हणून पुढे येणाऱ्या गावांना निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. भोकर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज गावातील सरपंच व ग्रामसेवक यांची आज मंगळवार […]

आणखी वाचा..

मुख्य लेखाधिकारी शिवप्रसाद चन्ना यांचा लेखा संघटनेकडून सत्कार

नांदेड,बातमी24:-जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून शिवप्रसाद चन्ना हे नुकतेच रुजू झाले असून त्यांचा सत्कार लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सय्यद मिनाझ यांनी दिली. तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे यांच्या जागी चन्ना यांची बदली झाली आहे.यानिमित्ताने लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांच्या कारवाईने कर्मचारी सरळ;सर्वांसाठी एकच बायोमेट्रिक बसणार

नांदेड, बातमी24:- सकारात्मक कार्याची प्रचती वेळोवेळो देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर चुकणारांची गय किंवा पाठीशी घालण्याच त्या काम ही करत नाहीत.त्यामुळेच विभागवार घेतलेल्या झाडाझडतीमध्ये 150 कर्मचारी गैरहजर आढळून आले.या कर्मचाऱ्यांना एक दिवसांच्या पगारकपतीची दंड दिला.यापुढे जिल्हा परिषदमध्ये सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच बायोमेट्रिक यंत्रणा बसविली जाणार असून तशा सुचना वर्षा ठाकूर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आपल्या […]

आणखी वाचा..

तृतीयपंथीय घटकांच्या विकासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील:-सुमंत भांगे

मुंबई, बातमी24 : तृतीयपंथीय घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी व या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असल्याचे मत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी ‘राज्य व केंद्रशासित प्रदेशांशी प्रादेशिक सल्ला मसलत करणे आणि स्थानिक प्रशासनाची संवेदनशीलता’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत श्री. भांगे बोलत होते. […]

आणखी वाचा..

अबब…नांदेडचे खासदार ही असुरक्षित;10 कोटी द्या अन्यथा जीवे मारू;सात महिन्यांपूर्वीची  धमकी निवेदनामुळे समोर

नांदेड, बातमी24:-संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड शहरातील वातावरण ढवळून निघालेले असताना भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना सात महिन्यांपूर्वी दहा कोटी रुपये दे अन्यथा सर्व कुटूंबाला मारून टाकू असे धमकी पत्र आल्याची माहिती आज समोर आली.या जुन्या धमकीच्या पत्राने आज नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नांदेडचे खासदर ही सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा […]

आणखी वाचा..