शरद पवार व उद्धव ठाकरेंनी स्वीकारले भारत जोडो यात्रेचे निमंत्रण

नांदेड, बातमी24:-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेचे निमंत्रण स्वीकारले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह मातोश्रीवर […]

आणखी वाचा..

हजारो शिवभक्तांच्या साक्षीने जलाभिषेक सोहळा थाटात;खा.हेमंत पाटील यांचा पुढाकार ठरला महत्वाचा

वसमत /हिंगोली / नांदेड,बातमी 24:-वसमत येथे दि.१३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रसंगी मिरवणुकीमध्ये घडलेल्या निंदनीय प्रकारामुळे तमाम शिवभक्त , शिवप्रेमी , शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.सोशल मीडियातून टीकेची झोड उठल्या नंतर दि . १५ रोजी ६०० शिवभक्त व खासदार हेमंत पाटील व उपस्थित नसलेल्या अनेक शिवभक्तांवर राजकीय हेतूने गुन्हे दाखल करण्यात आले. […]

आणखी वाचा..

मा.आमदार साबणे यांचा रडत पडत शिवसेनेला पूर्णविराम; भाजपच तिकीट जाहीर

नांदेड, बातमी24:-शिवसेनेकडून दोन वेळा आमदारकी भोगणाऱ्या माजी आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेनेचा त्याग केला.यावेळी त्यांनी शिवसेना सोडताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवित शिवसेना पक्ष अशोक चव्हाण यांनी संपविल्याची टीका केली. यावेळी त्यांनी ढसा ढसा रडत सर्वांच्या नजरा स्वतःकडे वळविल्या. आज भाजपच्या केंद्रीय समितीने साबणे यांची उमेदवारी जाहीर केली,तर ते उधा अधिकृतपणे भाजप […]

आणखी वाचा..

अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात पेट्रोल,डिझेल गॅस भाववाढीच्या विरोधात काँग्रेसचा मोर्चा

  नांदेड,बातमी24:-अच्छे दिनचे स्वप्न दाखवीत सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे भाव भरमसाठ वाढविले आहेत. पेट्रोल ने शंभरी पार करून दीडशे कडे वाटचाल सुरू केले आहे तर डिझेल शंभरी गाठत आहे .घरगुती गॅसच्या किमती अस्मानाला पोहोचल्या आहेत. यामुळे सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. देशावर लादलेल्या या महागाईचा एक दिवस विस्फोट होऊन यामध्ये […]

आणखी वाचा..

राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे सुरू करण्यासाठी जयंत पाटील-धनंजय मुंडे दोन दिवस जिल्हावारीवर

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- दमदार नेत्यांमुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकवेळ मोठा दबदबा होता.मात्र मागच्या सात ते आठ वर्षांमध्ये पक्षाची पुरती वाताहत झाली. या वाताहतीमधील वात तेवत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते पक्ष वाढीच्या दृष्टीने तालुका पातळीवर जाऊन पक्षाच्या […]

आणखी वाचा..

पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या महासचिवपदी बापूराव गजभारे

  नांदेड,बातमी24:-पिपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) महासचिवपदी नांदेड वाघाला महापालिकेचे नगरसेवक बापूराव गजभारे यांची नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीबद्दल गजभारे यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत झाली. य बैठकीला राज्यभरतील कार्यकारणी सदस्य हजर होते. या झालेल्या बैठकीत नव कार्यकारणी गठीत करण्यात आली. […]

आणखी वाचा..

नगरसेवक बापूराव गजभारे यांच्या पुढाकारातून लसीकरण जागृती

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या महामारीने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हजारो लोक बाधित झाले तर शेकडो लोकांना कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण गमवावे लागले आहे.पहिल्या लाटेप्रमाणे दुसरी लाट ओसरत आहे.मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.त्यामुळे लसीकरण करणे हा एकमेव पर्याय असून लसीकरणबाबत नागरिकांच्या मनात असलेले समज-गैरसमज दूर करणे हा जनजागृतीचा महत्वाचा भाग आहे. राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून […]

आणखी वाचा..

मंत्री डॉ.राऊत यांचा दलित मतदार काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न;मराठवाडा दौऱ्याची यशस्वी सांगता

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- राज्याचे ऊर्जा मंत्री तथा काँग्रेस अनुचित जाती-जमाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नितीन राऊत यांनी नुकताच मराठवाड्याचा शासकीय दौरा हा दलित समाजाला पुन्हा काँग्रेसकडे जोडणाचा प्रयत्न म्हणून बघितला जात आहे. या दौऱ्याच्या निमिताने डॉ.राऊत यांचे प्रत्येक जिल्ह्यात झालेले स्वागत आणि दलित समाजाने दौऱ्याच्या निमित्ताने दिलेला प्रतिसाद पाहता कॉंग्रेसपासून विभागलेला दलित मतदार बांधणीसाठी बेरजेचा ठरणार […]

आणखी वाचा..

देगलूर बिलोली मतदार संघात किनवटची पुनरावृत्ती करू:- फारूक अहमद

  नांदेड,बातमी24:-देगलूर बिलोली मतदार संघातील आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अचानक जाण्याने मतदारसंघात पोकळी निर्माण झाली ही पोकळी भरून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे राज्याचे प्रवक्ते फारूक अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या या महाभयंकर काळात मोठमोठ्या लोकप्रतिनिधींनी बचावात्मक भूमिका घेतली. मात्र सामान्य जनतेच्या हालअपेष्टांना थांबवण्यासाठी आपल्या जीवाची जराही पर्वा न करता वंचित […]

आणखी वाचा..

कोरोना बाधित आमदार बालाजी कल्याणकर भडकले

नांदेड,बातमी24- आ. बालाजी कल्याणकर हे कोरोनाग्रस्त झाले असून त्यांच्यावर सध्या गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी संबंधित एजन्सीच्या संचालकास बोलावून खडे बोल सुनावले आहेत. याबाबत आ. बालाजी कल्याणकर यांनी वैद्यकीय विभागाकडे तक्रार केली असून संबंधित एजन्सीचा करार रद्द करत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. […]

आणखी वाचा..