इतर

अभि. मिलिंद गायकवाडःमानवी मुल्ये जोपासणार्‍या अधिकार्‍याची सेवानिवृत्ती

जयपाल वाघमारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. ज्या समाजामध्ये डॉक्टर, इंजिनिअर आणि वकिल निर्माण झालेले असतील, अशा ज्या समाजाकडे कुणी बोट दाखविण्याची हिंमत करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलमंत्र मिलिंद गायकवाड यांनी अंगिकारला. पुढे औरंगाबाद येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शासकीय सेवेत रुजू झाले. अभि. मिलिंद गायकवाड यांनी 30 वर्षांच्या सेवेत कधीही पदाला गालबोट लागू दिले ना स्वतःला आर्थिक मोहात बांधून घेतले. आज ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.

मिलिंद गायकवा हे आज जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात उपअभियंता पदावरून सेवानिवृत्त होत आहे. मराठवाडयातील विविध भागात त्यांनी सेवा बजावली. मागच्या काही वर्षांपासून ते जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात उपअभियंता म्हणून आले होते. त्या दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे बर्‍याच वेळा प्रभारी कार्यकारी अभियंता पदाचा पदभार शासनाने दिला होता. मात्र नियमाला धरून काम करणारा अधिकारी जिल्हा परिषदेला महत्वाचा वाटला नाही.

जिल्हा परिषदमध्ये पदाधिकारी, सदस्य व कंत्राटदारांच्या ओझ्याखाली अधिकार्‍यांना दबून काम करावे लागते. ही बाब प्रभारी कार्यकारी अभियंता असताना मिलिंद गायकवाड यांच्या मनाला खटकत होती. त्यामुळे मिलिंद गायकवाड यांनी प्रभारी पदाचा नकार दिला.सेवेत असताना कितीही दबाव आला, तरी असत्या पुढे त्यांनी कधी ना झुकले ना पदाधिकारी व कंत्रासदारांच्या दबावाला बळी पडले. अलिकडे अधिकारी मंडळी प्रभारी पदाचा लाभ मिळावा, यासाठी वरिष्ठ अधिकारी-पदाधिकारी यांच्यापुढे गुडघे आणि मान झुकवून हाजी-हाजी करतात. यामागे त्या अधिकार्‍यांचा पदावर बसल्यास चिरीमिरी कमविणे हा इतकाच उद्देश असतो.

पदापेक्षा आपली पत, प्रतिष्ठा व मान जपून काम करणे हा कटाक्ष मिलिंद गायकवाड यांचा राहिला. आपल्या रोख-ठोक वागण्याचा त्रास मिलिंद गायकवाड यांना सहन करावा लागला. त्रास झाला, तरी निष्ठेने सेवा करण्याची मुळ वृत्ती त्यांनी कधीच सोडली नाही.यातून गायकवाड यांची कार्यपद्धती कंत्राटदार आणि पदाधिकारी व सदस्यांना खटकत राहिली. परंतु याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. मात्र पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांचा अवमान होईल, असे कृत्ये त्यांच्या हातून घडले नसावे.

शासकीय नौकरी करणारा वरिष्ठ अधिकारी समाजाच्या परिघाचा विचार करता करत नाही. स्वतःला साचेबद्ध न ठेवता समाजाच्या उत्कर्षासाठी आपलाही हातभर लागला पाहिजे,यासाठी ते कार्यमग्न राहिले. गरजूला मदत करणे आणि समाजाच्या सार्वजनिक कार्यास सढळ हाताने शक्य होईल तितके देण्याचा त्यांचा स्थायीभाव राहिला आहे.अभि. मिलिंद गायकवाड यांची तीस वर्षांची त्यांची निष्कलंक व तत्वाला प्रधान्य देणारी सेवा राहिली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दुबई सरकारने त्यांना उत्कृष्ट अधिकारी या किताबाने गौरविले. तसेच विविध धम्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते आज सेवेतून निवृत्त होत आहेत.सेवानिवृत्तीचे पुढील आयुष्य हे त्यांना उदंड व निरोगी लाभो.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago