इतर

लेखाधिकाऱ्यांच्या अजब मागणीची जिल्हाभरात चर्चा

 

जयपाल वाघमारे

नांदेड,बातमी24:- कोण काय मागणी करेल यांचा नेम नसतो,त्यातली त्यात सामान्य माणसाने मागणी केली,तर त्याचे नववल वाटत नसते,परंतु प्रशासनातील जबाबदार एका अधिकाऱ्याने अजब मागणी करून प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेचे सहाययक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांनी पाठीचा त्रास होत असल्याचे कारण पुढे केले आहे. देशमुख यांना दुचाकी चालविणे त्रासदायक होत आहे.त्यामुळे या देशमुख यांनी कार्यालयात घोडा घेऊन येण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यालायत घोडा घेऊन आलो तर घोडा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. पाठीचा त्रास,त्यात दुचाकीवर येण्यास होत असलेला त्रास पाहता, या महाशयांना घोड्यावर येणे सोयीस्कर वाटत आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घोडा बांधण्यासाठी परवानगी मागितली आहे.
21 व्या शतकात आरामदायी गाड्याचे प्रयोग रोज होत असतात.अशा माणूस त्रास होतच असल्यास नवीन गाडी घेऊ शकेल,परंतु घोड्यावर येण्याचा बेत आखला असून घोडा दिवसभर बांधून ठेवण्यासाठी जागा आरक्षित करून देण्याची मागणी करून एकच खळबळ उडवून दिली आहे.प्रशासन परवानगी देणार का याकडे आता लक्ष लागले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago