इतर

वन्य पक्षाच्या चारा-पाण्यासाठी जिल्हा परिषदेचे एक पाऊल पुढे

नांदेड, बातमी24:-
जिल्‍हा परिषदेत पक्षांसाठी पाण्‍याची व्‍यवस्‍था
नांदेड,3- जागतिक वन्‍यजीव दिवस जगभरात साजरा केला जातो. याचे औचित्‍य साधून आज बुधवार दिनांक 3 मार्च रोजी नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या परिसरातील वृक्षावर पक्षांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बालासाहेब रावणगावकर, समाजकल्‍याण सभापती रामराव नाईक यांच्‍या उपस्थितीत वृक्षांवर पक्षांसाठी मातीच्‍या कुंडयामध्‍ये पाणी ठेवण्‍यात आले आहे.

यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी रावसाहेब कोलगणे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोधनकर, डॉ. अरविंद गायकवाड, उप शिक्षणाधिकारी बंडू अमदुरकर यांच्‍यासह जिल्‍हा परिषदेतील खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*चौकट*
जिल्‍हा परिषदे अंतर्गत तालुक्‍यातील सर्व कार्यालय परिसरात प्राणी व पक्षांसाठी पाण्‍याची व्‍यवस्‍था करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. आता उन्‍हाळ्याची चाहुल लागली असून प्रत्‍येकाने पक्षांसाठी आपल्‍या घराच्‍या परिसरात पिण्‍यासाठी पाणी ठेवावे असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago