52 आकोडेबहाद्दर महावितरणच्या जाळ्यात

क्राईम

 

नांदेड,बातमी24:-
जिल्हयातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने आज वीजचोरांविरोधात मोहीम राबविली गेली. या मोहिमेअंतर्गत लोहा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या तीन गावामधील आकोडा टाकून अनधीकृतपणे वीज वापरणाऱ्या 50 आणि हदगाव उपविभागातील 12 लोकांवरती वीजकायदा 2003 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

वीजेच्या तारेवर आकडा टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आल्यानंतर मोहीम राबवून सोनखेड गावातील 15 तसेच कलंबर येथील 25 व लोहा शहरातील 10 लोकांविरोधात कारवाई करण्यात आली. हदगाव उपविभागातील कामारी गावातील 12 लोकांवरती वीजचोरीची कारवाई करण्यात आली आहे.

लोहा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचीन दवंडे, कनिष्ठ अभियंता शिवकुमार शेंबाळे, राधेश्याम जाधव तसेच हदगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही.टी. ढवळे कनिष्ठ अभियंता सुदर्शन जाधव, विनोद वाठोरे तसेच जनमित्र या कारवाईत सहभागी होते.