पाच हजार रुपयांची लाच घेणारा ग्रामसेवक जाळ्यात

क्राईम

 

नांदेड,बातमी24:- नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करून त्यातील पाच हजार रुपये स्वीकारणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले, की माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील शंकर राजेंना गुंडमवार वय.53 वर्षे याने वाचनालय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे नाहरकत प्रमाणपत्र काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती.

यातील पहिला हप्ता म्हणून 5000 रुपये शुक्रवार दि.25 रोजी घेण्याची कबूली दिली. या प्रकरणी लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी सापळा लावला असता,आरोपी शंकर गुंडमवार यास पंचासमक्ष पकडण्यात आले.या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात कपिल शेळके,जगन्नाथ अनंतवार, गणेश केजकर,विलास राठोड, नरेंद बोडके यांच्या पथकाने केली.