मंत्री चव्हाण यांचा इशारा तर खा.चिखलीकर यांची रस्त्यावर उतरण्याची भूमिका संजय बियाणी हत्याकांडानंतर राजकारण तापले

क्राईम

नांदेड, बातमी विशेष:- प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची काल दिवसाढवल्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्हा एकच खळबळ उडाली होती.या घटनेच्या पार्शवभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तात्काळ नांदेड गाठून मयत संजय बियाणी कुटूंबियांची सांत्वन केले. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संजय बियाणी यांची अंत्ययात्रा निघाली.या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले,की जिल्ह्यात अशा प्रकारे कुणाची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नसून आरोपी व या घटने मागचे सूत्रधार यांना पोलीस अटक करतील अशी ग्वाही देत हल्लेखोरांना इशारा दिला.तर आरोपींना पाच दिवसात अटक करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा आलटीमेंटम खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी श्रद्धांजलीपर भाषणात बोलताना दिला.

काल दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी बेछूट गोळीबार करत निर्घृण हत्या.संजय बियाणी यांची अंत्ययात्रा त्यांच्या शरदा नगर येथील राहत्या घरून निघाली. त्यापूर्वी कालपासूनच लोकांनी त्यांच्या घराकडे एकच गर्दी केली होती. आज सकाळी अशोक चव्हाण,खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार,प्रतिष्ठित, व्यापारी व नागरिकांनी भेट देऊन कुटूंबियांशी चर्चा केली.यावेळी मयत संजय बियाणी यांची पत्नीने खंडणी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप केला.या घटनेच्या पार्शवभूमीवर पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासमवेत बैठक घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.

अंत्यसंस्काराच्या वेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले,संजय बियाणी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तितका कमी असून बांधकाम क्षेत्रात नाव कमावलेले व्यक्तिमत्व होते. समाजशील उधोजक अशी प्रतिमा असलेल्या संजय बियाणी यांच्या हत्येचा व्हिडिओ पासून मला ही झोप आली नाही,असे प्रकार शहरात घडू नये,यासाठी कडक पाऊले उचलली जातील,यापुढे व्यापारी लोकांवर केली जाणारी दादागिरीचा बिमोड केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसू,तशा सूचन पोलीस प्रशासनाला दिल्या असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

तर चिखलीकर यांनी पोलिसांवर ताशेरे मारत माझा पोलिसांवरील विश्वास उडाला असल्याचे जाहीररीत्या सांगत या घटनेस पोलीस जबाबदार असून या प्रकरणाचा पोलीस तपास लावू शकतील की नाही,याबाबत माझ्या मनात शंका असल्याचे चिखलीकर म्हणत पाच दिवसांचा पोलिसांना आम्ही आलटीमेटम देत आहेत,त्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला.
——–
हितचिंतक संतप्त;पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर घोषणाबाजी
अंत्ययात्रा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर येताच संतप्त झालेल्या युवकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी करत अंत्ययात्रा थांबविण्याचा प्रयत्न केला.