नांदेड, बातमी24ः– शहरातील नवा मोंढा येथील शंकर नागरी सहकारी बँकेची रक्कम आयडीबीआय बँकेच्या खात्यातील होती. यातील हॅकर्सने या खात्यातील तब्बल 14 कोटी 50 लाख रुपये लांबविले. या घटनेने मोठी खळबळ उडाली, बसून या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शंकर नागरी सहकारी बँकेचे खाते वजिराबाद येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत आहे. या बँकेच्या शाखेतील शंकर नागरी सहकारी बँकेच्या खात्यातील 14 कोटी 50 लाख रुपये एनईएफ टी व आरटीजीएस च्या माध्यमातून हॅकर्सने लांबविले. हा प्रकार शंकर नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापनास बुधवारीसमोर आला आहे. मात्र पैशावर डल्ला मारल्याचा प्रकार दि. 2 व 3 डिसेंबर दरम्यान घडला असल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणी शंकर नागरी सहकारी बँकेचे व्यवस्थापक विक्रम राजे यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली, यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचसोबत नांदेड परिक्षेत्राचे विशेष उपमहानिरीक्षक तथा पोलिस अधीक्षक आदींची भेट घेऊन तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. सहकारी बॅकेतील ठेवीदार व खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत. त्यामुळे खातेदार व ठेवीदारांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे शंकर नागरी सहकारी बँकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.