नांदेड,बातमी24ः नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या बारा हजार पार झाली आहे. मागच्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ झाल्याचे समोर आले आहे, तर आतापर्यंत मृतांची संख्या ही 320 पार गेली आहे.
मंगळवार दि. 15 रोजी 1 हजार 485 जणांची तपासणी करण्यात आली. यात 940 जणांची अहवाल निगेटीव्ह तर 345 जणांचे स्वब कोरोना सकारात्मक झाले. यात आरटी-पीसीआर चाचणीत 58 व अंटीजनमध्ये 287 जणांचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार 182 एवढी झाली आहे. 213 जणांवर उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. एकूण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 हजार 909 एवढी आहे. सध्या 3 हजार 889 जणांवर उपचार सुरु आहेत. 51 जणांची प्रकृती गंभीर आहे.
345 जणांच्या आज आलेल्या अहवालात सर्वाधिक रुग्ण हे नांदेड शहरात 123 जणांचा समावेश आहे. त्यानंतर लोहा-40, कंधार-35, मुखेड-28, अर्धापुर-15, हदगाव-14, किनवट-11 असा समावेश आहे. त्याचसोबत हडको येथील 76 वर्षीय महिलेचा दि. 15 रोजी, बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील 64 वर्षीय पुरुषाचा दि. 15 रोजी, नांदेड येथील गवळीपुरा येथील 80 वर्षीय पुरुषाचा दि. 15 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 321 एवढी झाली आहे.