बंजारा समाज शिष्टमंडळाचा विकास प्रश्नांवर अशोक चव्हाण यांच्याशी संवाद

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः– राज्यांचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्यचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने संवाद साधला. या वेळी पोहरादेवीचे संत रामरावजी महाराज यांचे पुतणे महंत बाबुसिंग महाराज, बलदेव महाराज, रमेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.

शिष्टमंडळाने हरितक्रांतीचें जनक व महाराष्ट्राचें माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासंदर्भात व भोकर येथील संत सेवालाल महारा यांच्या स्मारक तसेच पोहरादेवीच्या मंदिराच्या विकास कामासंदर्भात सविस्तरपणे चर्चा झाली. यावेळी आ. अमर राजुरकर , माजी मंत्री डी. पी. सावंत, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, काँग्रेसचे ओ. बी. सी.विभागाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, प्रवक्ते संतोष पांडागळे , प्रा. कैलास राठोड , विनोद चव्हाण चिदगिरीकर , साहेबराव राठोड चेनापूरकर आदीची प्रमुख उपस्थिती होती.