नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या लढयातील भुकेल्या गोरगरिबांचे योद्धा ठरलेल्या सौ. सोनी सत्येंद आऊलवार यांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास दोन लाख रुपयांचे पीपीई किटचे वाटप करून मदतीचा हातभार लावला. या किटचे वाटप नुकतेच करण्यात आले.
लोहा तालुक्यातील सोनखेड येथे राहणार्या आऊलवार कुटुंबियांनी कोरोनाच्या काळात विश्वभोजनाच्या माध्यमातून परराज्यात जाणार्या व ग्रामीण भागात भाकरीशी संघर्ष करणार्या कुटुंबियांना अन्नदान करण्याचे मोठ दोन महिने चालविले. या त्यांच्या कार्याची दखल शासनानाने ही घेतली.
मुंबईनंतर पुण्यात कोरोना प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला. तेथील कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणार्या डॉक्टरांना पीपीई किट दिली जावी, यासाठी पाचशे किटचे वाटप केले. सर्व किट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णालयास पोहचली केल्या. पुण्यानंतर आपल्या जन्म व कर्मभुमी असलेल्या नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ही कृष्णा गु्रुप ऑफ अॅग्रीकल्चरल सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड या कंपनीकडून दोन लाख रुपये किंमतीच्या 100 किट वाटप केल्या.
—-
कोरेानासारख्या महामारीच्या काळात वैद्यकीय टीम ज्या धीरोदात्तपणे काम करत आहे. त्यांच्या कार्यास आपला ही हातभार लागला पाहिजे, यासाठी किट शासकीय रुग्णालयाकडे किट सुपुर्द केल्या आहेत.
सौ. सोनी सत्येंद्र आऊलवार