मुखेडमध्ये सर्वाधिक तर नांदेडमध्ये एक जण

ताज्या बातम्या नांदेड

 

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात सोमवार दि.15 जून रोजी कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये पाच 5 रुग्ण हे मुखेड तर एक रुग्ण हा नांदेड शहरातील आहे.

नवीन आलेले सहा रुग्णांमध्ये मुखेड तालुक्यातील बाऱ्हाली येथील तिघांचा समावेश आहे, तिघे ही पुरुष असून त्यांचे वय हे 62,52 व 47 असे आहे. मुखेड शहरात दोन महिला आहेत,यांचे वय 55 व 52 असे आहे. या सर्व रुग्णांना मुखेड मधील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले.

नांदेड शहरातील बरक्तपुरा येथील 32 वर्षीय युवकास ही कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 262 झाली आहे. डिस्चार्ज झालेले रुग्ण हे 177,उपचार घेत असलेले रुग्ण 72 आहेत,तर आतापर्यंत 13 जण मरण पावले आहेत.