बोगस बियाणे विक्रेते अन कंपनीवर गुन्हा दाखल करा-मानसपुरे

ताज्या बातम्या

कंधार,बातमी24:-
तालुक्यातील कृषि दुकानदार व कंपनी मालकाच्या सगमताने सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्री केली आहे.यामुळे कर्ज बाजारी शेतकरी अडचणी सापडलेला आहे.या प्रकरणी चौकशी करून करावी व दुकानदार व कंपनी विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांनी उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली.

कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची सद्या बिकट अवस्था असून गत वर्षांत शेतात दिवस रात्र मेहनत करून कापूस,ज्वारी,तूर ,उत्पादन करुनही खरेदीसाठी कोणीही मार्केट घेत नसल्यामुळे घरी कीड लागली आहे.त्यामुळे अगोदरच हताश झालेला शेतकरी यावर्षी सावकारी कर्ज काढून चड्या व मनमानी भावात कृषी दुकानदारांकडून सोयाबीन बियाणे खरेदी केली व शेतात पेरण्या केल्या. मात्र चक्क बोगस सोयाबीन बियाणे कंपनी व कृषि दुकानदार संगनमताने शेतकऱ्यांना विक्री केली असल्याने सोयाबीन बियाणे उगवण झाली नाही.
गत वर्षी मार्केटमुळे संकट तर यावर्षी कोरोना मुळे लाकडाऊने हाताश शेतकरी आहे त्यात आता बोगस बियानामुळे पुन्हा अडचणी आणणारे कंपनी मालक व कृषि दुकानदाची चौकशी करा व त्यांच्यावर फोजदारी
गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तात्काळ देऊन दिलासा द्यावा अशी मागणी केली.