संचारबंदीचे आदेशाची अंमलबजावी कडक होणार; जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट संकेत

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यातील जनता व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार व मागणी पाहता जिल्ह्यात संचारबंदीची अंमलबजावणी रविवारी रात्री बार वाजल्यांपासून सुरु होणार आहे. या आदेशाची आठ दिवस कडक अंमलबजावणी केली जाणार असून नियम तोडणार्‍या कोणाचीही गय केली जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

 

शनिवार दि. 11 जुलै रोजी फे सबुक लाईव्ह या प्रशासकीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी विपीन इटनकर,पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. इटनकर व मगर यांनी रविवारी रात्रीपासून लागू होणार्‍या टाळेबंदीच्या संदर्भात जिल्ह्यातील नागरिकांना माहिती देत नागरिकांच्या प्रश्नांची उत्तर देत अनेक सूचनांही समजून घेतल्या.

कोरोना-19 टाळेबंदीच्या काळात जनतेच्या हितांना प्रशासनाच्या वतीने अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेची कुठेही गैरसोय होऊ न देण्यावर लक्ष दिले. शासनाच्या आदेशान्वये टाळेबंदीत शिथिलता देण्यात आली होती. यात काळात ग्रामीण व शहरी भागात वाढत्या रुग्णंची संख्या पाहता संचारबंदीचे आदेश दि. 10 जुलै रोजी देण्यात आले आहेत. तर यासंबंधी अंमलबजावणी दि.12 जुलैच्या रात्रीपासून केली जाणार आहे.

 

सकाळी सात ते दहा असे तीन तासांची सुट असणार असली, तरी त्यानंतर रुग्णालय व अत्यावश्यक बाबीं करिता सुट देण्यात आलेली आहे. त्याव्यतरीत कुणास ही रस्त्यावर फि रण्यास मुभा नसणार नाही, तसे कुणी दिल्याच त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनास दिल्या आहे.यासाठी अधिकार्‍यांची पथके सुद्धा नेमण्यात आली आहे. जिल्हाभर 20 जुलैपर्यंत कडक अंमलबजावणी असेल असे डॉ. इटनकर यांनी सांगितले.