मुंबई,बातमी24:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या मुंबई दादर येथील राजगृहावरील हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे.
मंगळवार दि.7 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करण्यात आली. याचशिवाय बंगल्याच्या काचा फोडत बंगला आवारातील कुंड्या ही फेकून देण्यात आल्या.
राजगृह हे जगभरातील आंबेडकर अनुयायांची प्रेरणाकेंद्र आहे.हे निवासस्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी पुस्तके ठेवण्यासाठी बांधले होते.
या हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध नोंदविण्यात येत असून आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे.याप्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याचे समजत.या प्रकरणी घटनास्थळाचा पाहणी पोलिसांनी केली.