जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24;- नांदेड जिल्ह्यातील एकमेव अनुसुचित जाती राखीव मतदारसंघ हा देगलूर-बिलोली विधासभा मतदारसंघ असून या मतदारसंघात उमेदवारी मिळावी,यासाठी चुरस सुरू आहे. मात्र हवसेनवस्यांनी स्वतःला बाजार भरविला आहे.मात्र ज्यांनी ग्रामपंचायतची साधी निवडणूक लढविली नाही,असे फाट्यावर बसलेलले कावळे मुंबईवारीसाठी कावकाव करत असले,तरी दमदार उमेदवार अजूनही काँग्रेसच्या मनसुब्यात उतरत नाहीत, परंतु आंबेडकरी समाजाचे नेते जेष्ठ नेते सुरेश गायकवाड यांच्या सारखा नेते कदाचित काँग्रेसमध्ये आल्या या पक्षाला संजीवनी मिळू शकते,शिवाय आंबेडकरी चेहरा म्हणून सुरेश गायकवाड यांच्या रूपाने पक्षाला मोठं योगदान मिळू शकते,अशी लोकांमधून भावना व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीला आणून दोन ते तीन महिन्यांच्या अवधी शिल्लक असून आमदारकी लढण्यासाठी सगळीकडे भाऊगर्दी वाढत आहे.दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने सगळ्यांना आमदारकीची निवडणूक लढवून नशीब आजमावे अशी आकांक्षा बाळगून आहेत. मात्र उठसूट कुणी उठत आहेत, आमदारकी लढतो म्हणून कपाळाला गुलाला आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.असो तो स्वप्न पाहणाऱ्या सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे.
विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणाचे समीकरणे बदलून गेली,असून अशोक चव्हाण यांचा जिल्ह्याच्या राजकारणावरील साठ दशकाचा अंमल आणि एकछत्री वरदास्त पाहिजे,तसा राहिला नाही, चव्हाण यांचे भाजप जाणे लोकांच्या पसंती उतरले नाही,परिणामी लोकांनी लोकसभा निवडणुकीत भाजप अर्थात चव्हाण यांचा प्रताप पाटील चिखलीकर यांचा रूपाने पराभव केला.
या बदलेल्या राजकीय समीकरणात भाजप पेक्षा काँग्रेसला हत्तीचे बळ आले असले, तरी संघटनात्मक पातळीवर या पक्षात मोठ्या उणिवा आहेत, मात्र कोणत्याच नेत्यांचे विमान सध्यातरी जमिनीवर उतरायला तयार नाही,नेते हवेत आणि कारभार भुईसपाट असाच आजतरी बघायला मिळत आहे.
देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जितेश अंतापुरकर हे आजघडीला घरके ना घाटके झाले आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यागत आहे. या मतदारसंघात आंबेडकरी समाजाल अद्याप प्रतिनिधित्व मिळलेले नाही,त्यामुळे चाळीस वर्षाच्या राजकीय व सामाजिक चळवळीचे योगदान पाहता सुरेश गायकवाड यांच्या इतका मोठा काँग्रेसला मराठवाड्यात नेता मिळू शकत नाही.हे सत्य नाकारता येत नाही.
भारिप बहुजन महासंघाच्या रूपाने सुरेश गायकवाड यांनी मराठवाड्यात पक्षाचा झजावंत निर्माण केला.अनेकांना नगरसेवक केले,कुणी पंचायत समिती सदस्य झाले.आणि गाव तिथे पक्षाची शाखा स्थापन करून पक्षाला उभारी दिली.स्वतः चार विधानसभा तर एक लोकसभा निवडणुकीचा अनुभव आणि प्रदीर्घ राजकारणी,चळवळीचे विचारवंत म्हणून सुरेश गायकवाड यांची प्रतिमा राज्यभर आहे. त्यांच्या प्रदीर्घ राजकारणांचा फायदा कॉंग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चित होऊ शकतो.मात्र हे सगळं स्थानिक कॉग्रेस नेत्यांना कदाचित समजलं किंवा उगमल तर त्याचा अधिक लाभ सुरेश गायकवाड यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाला होऊ शकतो,अशी भावना व्यक्त केली जात आहे.
येणाऱ्या निवडणुकीत देगलूर विधासभा निवडणुकीत सुरेश गायकवाड काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहिल्यास पक्षाला विजय हमखास मिळू शकतो,त्याहीपलीकडे जाऊन पाहिले असता, जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुरेश गायकवाड यांना मानणारा मोठा आंबेडकरी समाजाचा वर्ग असून त्यांचे मतदान काँग्रेस लाभ मिळवून देऊ शकते. सुरेश गायकवाड यांच्या जमेच्या बाजू काँग्रेसने राजकीय भूमिकेतून पाहिल्यास आंबेडकरी समाजातील ताकदीचा नेता पक्षाची बाजू मजबूत करण्याची क्षमता राखू शकतो.अशी भावना आंबेडकरी समाजातून व्यक्त होत आहे.