नांदेड, बातमी24:- मागच्या बऱ्याच दिवसांनी पावसाने दिलेल्या विश्रांतीनंतर मागच्या चार ते पाच दिवसापासून पाऊस सक्रिय झाला आहे.यात सोमवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.वादळीवाऱ्यासह विजांचा कडकडाट पडलेल्या पावसाने कपाशीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारी सकाळपासून कडक उन्हासह उकाडा जाणवत आहेत.सायंकाळी पावसाला सुरवात झाली,साधारणता साडे सहा वाजेच्या सुमारास पावसाळा सुरवात झाली,यावेळी वादळी वारे व विजांचा कडकडाट झाला. तासभर पावसाने चांगलेच झोडपून काढले.या पावसामुळे शहरातील सखल भागात पाण्याचे तळ साचले होते.तर शेतामध्ये सुद्धा पाणीच पाणी झाले असल्याचे सांगण्यात आले.या पावसामुळे शेतीचे किती नुकसान झाले,हे उधा कळणार आहे.