प्रशासक लागल्याने तत्कालीन पदाधिकारी-सदस्य सैरभैर;शासकीय निवासस्थान कुलुपबंद होणार!

नांदेड

नांदेड, विशेष प्रतिनिधी
नांदेड जिल्हा परिषद स्थापनेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक लागले आहे. अलिकडच्या 32 वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.निवडणुका लांबणीवर पडल्याने आता जिल्हा परिषदमधील बसायचं हक्कच ठिकाण पदाधिकारी असो किंवा सदस्य यांना उरले नाही.परिणामी सदस्य व पदाधिकारी यांना मी कुठे बसू असा प्रश्न पडल्याने ते सैरभैर झाल्याचे बघायला मिळाले.पदाधिकारी यांचे निवासस्थान सुद्धा कुलुपबंद होण्याची शक्यता असल्याने पदाधिकारी व सदस्य यांच्या चिंतेत भर पडली असल्याचे सांगण्यात आले.

नांदेड जिल्हा परिषदेवर 21 मार्चपासून प्रशासक आले असून सत्तेची सर्व सूत्र सीईओ यांच्या हाती गेली आहेत. कालपासून पदाधिकारी यांच्याकडील शासकीय वाहने काढून घेण्यात आली आहे.तसेच शासकीय दालन व अंर्तगत केबिन सुद्धा कुलुपबंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या मंगाराणी अंबुलगेकर यांनी शासकीय निवासस्थान सोडले रविवारीच सोडले.बाळासाहेब रावनगावकर यांचे दालनास कुलूप लागले आहे. इतर पदाधिकारी तूर्त तरी उपभोग घेत आहेत. मात्र या माजी पदाधिकारी यांना सुद्धा दालन सोडावे लागणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रशासकीय नियम चालविण्यापूर्वी दालन सोडावे,अशी अपेक्षा त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. मात्र कालपासून मुख्य इमारतीमध्ये बसण्याचे ठिकाणास कुलूप लागल्याने सूत्र हलवायची झाल्यास या पदाधिकारी-सदस्यांना कामानिमित्त का असेना टेबल टू टेबल घिरट्या घालाव्या लागणार आहेत.काही पदाधिकारी यांनी तर भाडे तत्वावर शासकीय निवासस्थान घेण्याचा इरादा आखला आहे.यावर प्रशासन काय कारवाई करते,याकडे ही नजरा असणार आहेत.