नांदेड,बातमी24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 211 अहवालापैकी 758 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 681 तर अँटिजेन तपासणीद्वारे 11 अहवाल बाधित आले आहेत. आज घडीला 3 हजार 383 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे किनवट तालुक्यातील सावरगावतांडा येथील 54 वर्षे वयाच्या पुरुषाचा 17 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 656 एवढी आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 455, नांदेड ग्रामीण 61, भोकर 1, देगलूर 4, धर्माबाद 6, कंधार 12, हदगाव 3, किनवट 37, लोहा 26, मुदखेड 11, मुखेड 12, नायगाव 1, उमरी 3, बिलोली 1, माहूर 4, परभणी 13, अमरावती 6, उमरखेड 1, हैद्राबाद 7, लातूर 1, नंदुरबार 1, अकोला 1, हिंगोली 14 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 12, नांदेड ग्रामीण 9, अर्धापूर 2, बिलोली 2, धर्माबाद 14, देगलूर 2, कंधार 2, माहूर 10, मुदखेड 10, मुखेड 10, नायगाव 3, उमरी 1 असे एकूण 758 कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 12, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 420, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 37, खाजगी रुग्णालय 5 असे एकुण 474 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 757, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 560, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 22, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 3 हजार 383 व्यक्ती उपचार घेत आहेत.