कोरोनाच्या रुग्ण संख्येत दुसर्‍यांदा मोठी वाढ

नांदेड

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्ण संख्येत मागच्या आठ दिवसानंतर मोठी वाढ झाली आहे. 445 नमूने तपासण्यात आले. यामध्ये 327 नमूने निगेटीव्ह आले तर तर 83 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यापूर्वी नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी 94 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतरची 83 सर्वाधिक संख्या नोंदविली गेली आहे.

मागच्या आठवडयात कोरोनाच्या रुग्णंसंख्या 94 झाली होती. त्यानंतर संख्या नियंत्रणात येत-येत कमी झाली होती. अगदी तीस ते चाळीसवर आली होती. मात्र शनिवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक हजार 252 झाली. दुसरीकडे 19 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत.672 रुग्ण बरे झाले आहेत. तर 513 रुग्ण हे उपचार घेत आहेत.
——-
दोघांचा मृत्यू
मुखेड तालुक्यतील मुक्रमाबाद येथील 65 वर्षीय महिलेचा दि. 24 जुलै रोजी मृत्यू झाला. तसेच दि. 25 जुलै रोजी नांदेड येथील खाजा कॉलनी येथील 50 पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
——
सूचनाः यासंबधीची सविस्तर माहिती थोडया वेळात