नांदेड, बातमी24ः- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबडेकर यांचे नांदेड येथे मंगळवार दि. 7 जुलै रोजी आगमन होणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे दक्षीण जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी दिली.
अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला येथून नांदेडच्या दिशेने निघून अकरा वाजता त्यांचे नांदेड येथे पोहचणार होते. या दौर्या दरम्यान ते पदाधिकारी बैठक व मागासवर्गीयांवर होणार्या अन्याय-अत्याचाराच्या संदर्भात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांशी संवाद साधणार होते. या दौर्याच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागताची तयारी सुद्धा करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या दौर्यात बदल झाला, असून काही कामानिमित्त मुंबईकडे जावे लागले असल्याचे प्रशांत इंगोले यांनी कळविले.