अद्यावत रुग्णवाहिका रुग्णसेवेत दाखल;रुग्णसेवेला होणार मदत

नांदेड

 

नांदेड, बातमी24:- ग्रामीण भागातील रुग्णसेवा अधिक सोयी सुविधायुक्त व्हावी,यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुढे सरसावले,असून त्यांच्या आमदार निधीतून दहा रुग्णवाहिका जिह्यातील रुग्णसेवेसाठी आरोग्य विभागात दाखल झाल्या आहेत.या रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अबूलगेकर, विधान परिषद आमदार अमर राजूरकर,महापालिका महापौर मोहिनी येवनकर आदींच्या उपस्थित झाले.

कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून आरोग्य सुविधाकडे लक्ष दिले जात आहे. रुग्णांना सुविधा दिल्या जाव्यात,यात रुग्णास अत्यावश्यक उपचारासाठी घेऊन जाणे,सोडणे शक्य व्हावे, यासाठी रुग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावत असतात, या सगळ्या बाबींचा विचार करून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व लोकप्रतिनिधी यांना रुग्णवाहिकासाठी निधी देण्यात यावा,असे सूचित केले होते,त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 10 रुग्णवाहिका आमदार फंडातून उपलब्ध झाल्या आहेत, यातील तीन रुग्णवाहिका या आदिवादी भागाकरिता सुद्धा असणार आहेत.

या रुग्णवाहिकांना हिरवी झेंडी मंगाराणी अबुलगेकर,आमदार राजूरकर,महापौर मोहिनी येवनकर,माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर,समाज कल्याण सभापती रामराव नाईक,शिक्षण सभापती संजय बेळगे, कृषी सभापती बाळासाहेब रावनगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर आदींची उपस्थिती होती.