सामाजिक न्यायाची निसर्ग संवर्धनानंतर आता अद्यावत कार्यालयाकडे वाटचाल

नांदेड

नांदेड, बातमी24ः– व्यवस्थेच्या अंतर्गत प्रवाहापासून दूर असलेल्या अशा घटकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक समृद्धीचा पायाभरणी करणारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कायम दुर्लक्षित असते. या कार्यालयाकडे बघण्याचा दृष्टीकोनही इंतर समुह घटकांचा संकोचित असाच राहतो. परंतु कार्यालयाच्या निर्मितीनंतर या परिसराचा निसर्ग संवर्धनाच्या माध्यामातून कायापालट झाला आहे. आता या कार्यालयाची अद्यावतीकरणाकडे वाटचाल सुरु झाली आहे.

शहरापासून तीन ते चार किलोमीटर दूर असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची भव्य इमारत आहे. या इमारतीची निर्मिती आघाडी सरकारच्या काळात झाली. दोन वर्षांपूर्वी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त म्हणून आलेल्या टी. माळवदकर यांनी या परिसरात भव्य असे गार्डन उभारले आहे. त्याचसोबत वर्षांनुवर्षे टिकतील, अशा झाडांची लागवड सुद्धा केली आहे. त्यामुळे इमारतीच्या परिसरात नव्याने येणार्‍या व्यक्तीस आश्चर्याचा धक्का बसतो.

कामाच्या निमित्ताने येणार्‍या अभ्यांगता गार्डनमध्ये बसून फ ोटो काढण्याचा मोह आवरत नाही. या गार्डनमध्ये वेगवेगळया जातींचे फु ल झाडे ही मनाला प्रसन्न करून जातात. शासकीय इमारतीचा एकमेव असा परिसर हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य कार्यालयात बघायला मिळतो. झाडी, गार्डन व फु लांनी बहरलेला देखणा परिसर बनविण्यासाठी टी. माळवदकर यांनी परिश्रम घेतले. त्याचसोबत कार्यालयात आल्यानंतर ते आवर्जून निगराणीसंबंधी चौकशी करतात, अधून-मधून फे रफ टका सुद्धा मारतात, काही कर्मचारी ऐच्छिक पातळीवर सेवा देण्याचा प्रयत्न ही करतात. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयाने आदर्श घ्यावा असा परिसर बनला आहे.

कार्यालयात कुणालाही गुटखा किंवा पानमसाला खावून मज्जाव घालण्यात आलेला आहे. पिचकार्‍यांनी भिंती रंगविणारे ही शौकिन अभ्यांगत व कर्मचार्‍यांचे तसे घाण करणारे वर्तन थांबले आहे. टी. माळवदकर यांनी कार्यालयीन अभिलेखे अद्यावत करण्यावर भर दिला, असून मागच्या पंधरा वर्षांपासून आस्थावेस्त पडलेल्या संचिका, व्यवस्थितपणे इलेवारी लावण्याचे काम सुरु केले, असून पुढील काळात संगणकीकरणाशी त्या जोडल्या जाणार असल्याचे टी. माळवदकर यांनी सांगितले.