कोरोडो रुपयांचा निधी परत गेल्यावरून महाआघाडीत धूसफु स

नांदेड

कोरोडो रुपयांचा निधी परत गेल्यावरून महाआघाडीत धूसफु स

नांदेड, बातमी24ः-नांदेड जिल्हा परिषदेचे कोरोडो निधी परत गेल्यावरून आजी-माजी पदाधिकार्‍यांमध्ये धूसफु स सुरू झाली आहे. नव्या पदाधिकार्‍यांचे अपयश झाकण्यासाठी जुन्या पदाधिकार्‍यांवर केले जाणारे आरोप हे निर्थक व बिनबुडक्याचा आहेत, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी सांगितले.

कोरोडो रुपयांचा निधी परत गेला आहे. या निधीच्या बाबतीत विद्यमान पदाधिकार्‍यांनी एखाद्या वेळी तरी आढावा घ्यायला हवा होता. परंतु याकडे दुर्लक्ष केले. जिल्हा परिषदेच्या दोन खात्याचा मी सभापती राहिलो. माझ्या खात्यातील एक कोटी रुपये परत गेले. उर्वरीत 80 ते 85 कोटी रुपयांचा निधी परत जाण्यास त्या-त्या खात्याचे पदाधिकारी जबाबदार आहेत.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा घेतला, असता विद्यमान पदाधिकार्‍यांनी चुकीची माहिती मंत्री महोदयांना देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. कोणत्या-विभागाचे नियोजन होऊ न शकल्याने निधी गेला, याबाबतची माहिती सांगणे अपेक्षीत होते. परंतु स्वतःचे अपयश झाकण्यासाठी मंत्री महोद्दयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असल्याचा आरोप समाधान जाधव यांनी केला.
—–
चौकट
निधीच्या परत जाण्यावरून आजी-माजी पदाधिकार्‍यांमध्ये पेटलेला शाब्दीक वाद पेटत चालला आहे. निधी कुणामुळे गेला हे महत्वाचे नसून काँग्रेसच्या सत्ता काळात निधी गेला, असे मत सामान्यांमधून व्यक्त होत आहे. विकासाची दुरदृष्टी असलेले अशोक चव्हाण हे जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्यात ताब्यातील जिल्हापरिषदेचा ऐंशी ते नव्वद कोटी रुपयांचा निधी परत जाणे हे एकाप्रकारे सत्ताधिकार्‍याचे अपयश मानले जाते.