आकाशवाणी सेवानिवृत्त केंद्र सहसंचालक भिमराव शेळके यांचा या कारणांमुळे झाला मृत्यू

नांदेड

नांदेड, बातमी24ः- आकाशवाणीचे सेवानिवृत्त सहकेंद्र संचालक भिमराव शेळके यांचा मृत्यू मंगळवार दि. 21 जुलै रोजी झाला होता. यांच्यावर बुधवार दि. 22 जुलै रोजी दुपारी अंत्यंस्कार करण्यात आले. भिमराव शेळके यांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

आकाशवाणी कार्यक्रम सहकेंद्र संचालक पदावरून 2017 साली निवृत्त झालेल्या भिमराव शेळके यांनी आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांना घरा-घरात पोहचविण्याचे काम केले. नांदेडच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते. अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे काम त्यांनी केले.

दोन दिवसांपूर्वी भिमराव शेळके यांना प्रकृती अस्वस्थामुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवार दि. 21 जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. मृत्यू पश्चात कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. बुधवार दि. 22 जुलै रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.