जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी केली प्रस्तावित रुग्णालय जागेची पाहणी

नांदेड

नांदेड,बातमी24:- नांदेड उत्तर शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या शंभर खाटाच्या प्रस्तावित रुग्णालय जागेची पाहणी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केली. जागेच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी डॉ.विपीन इटनकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

नांदेड शहर व नांदेड तालुका ग्रामीण भागाची लोकसंख्या विचारात घेता, ग्रामीण भागात शंभर खातांचे रुग्णालय ग्रामीण भागाशी जोडले जावे,अशी नागरिकांची होती. त्या अनुषंगाने आमदार बालाजी कल्याणकर यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. यास यश आले असून याबाबत आमदार कल्याणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी आभार ही मानल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाले होते.

या प्रस्तावित रुग्णालयाबाबत वाडी बुद्रुक परिसरातील पूर्णा रोडवरील जागेची पाहणी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर, नांदेड तहसीलदार किरण अंबेकर,बंडू पावडे,माधव पावडे, विठ्ठल पावडे,प्रताप पावडे,रमेश लोखंडे, बाळासाहेब पावडे, मंडळ अधिकारी जोंधळे,तलाठी सचिन नरवाडे,ग्राम विकास अधिकारी संजय कानवडे यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.