नांदेड,बातमी24:- मागच्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेगणिक वाढत आहे.त्यामुळे नांदेड शहराच्या हद्दीत दोन कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार असून कौठा व भक्ती कोविड सेंटर या ठिकाणी तसेच मुंबई व पुण्यातून नांदेड येथे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी दिली.
डॉ.लहाने म्हणाले,की मुंबई व पुणे येथे कोरोनाने बाधित होणाराची संख्या मोठी आहे. येथून नांदेड येथे येणारे प्रवाशी संख्या मोठी आहे.संभाव्य धोका आणि संसर्ग रोखता यावा,यासाठी प्रवाशांची अँटीजन चाचणी केली जाणार आहे.यात प्रामुख्याने ट्रॅव्हल्स व रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष असणार असल्याचे डॉ.लहाने यांनी आवर्जून सांगितले.
कोरोनाची बाधा झालेल्या बाधितांमध्ये आजघडीला सौम्य स्वरूपाचे लक्षणे आढळून येत आहेत.या बधितांना घरीच उपचार दिले जाणार आहेत. या बाधितांची मनपा रुग्णालय डॉक्टर टीम लक्ष ठेवून आहे.मात्र कोणत्याही परिस्थितीत औषधी तुटवडा पडणार नसून याबाबत खबरदारी घेतली आहे,ज्याचे लसीकरण झाले नाही,त्याचे लसीकरण करून घेण्यावर विशेष अभियान चालविले जात असे लहाने यांनी कळविले.