प्रादुर्भाव रोखण्यासाठी समन्वय अधिकार्‍यांचे कवच

नांदेड

नांदेड, बातमी24:- जिल्हयातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून
16 अधिकार्‍यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून रुग्णांना पुरविण्यात येणार्‍या उपचारासंबंधीत व त्यांना देण्यात येणार्‍या सोई-सुविधा, स्वच्छता विषयक बाबी, डॉक्टर, नर्ससच्या समस्या, रुग्णांच्या समस्या व इतर आरोग्य विषयक समस्या आदी पडताळणीचे काम असणार आहे.

या पथकात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर यांची हदगाव येथे तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार यांची हिमायतनगर, भोकरचे कार्यकारी अभियंता शंकर व्ही. तोटावाड यांची किनवट येथे, किनवटचे उपविभागीय कृषि अधिकारी बी.पी.कदम यांची माहुर येथे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची देगलूर येथे, शिक्षणाधिकारी (मा.) बालासाहेब कुंडगीर यांची मुखेड येथे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) सुधीर ठोंबरे यांची बिलोली येथे तर कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांची नायगाव येथे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पा.पु. व स्वच्छता दिलीप इंगोले यांची नांदेड येथे तर कार्यकारी अभि. बांधकाम विभाग (उत्तर) अनिल करपे यांची अर्धापूर येथे तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.व बा) सुनिल शिंगणे यांची कंधार येथे, नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी एम.के.सोनटक्के यांची लोहा येथे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.आकाश देशमुख यांची धर्माबाद येथे, राज्यकर सह आयुक्त राहुल कळसे यांची उमरी येथे तर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.एम.आर.रत्नपारखी यांची भोकर येथे, कृषि उपसंचालक तर एम.के.सोनटक्के यांची मुदखेड येथे यांची समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.