दिवसभरात कोरोनाने गाठला दुहेरी आकडा

नांदेड

नांदेड, बातमी24ः– कोरोनाचे वाढत रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसून सोमवार दि. 6 जुलै रोजी सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा अकडा दुहेरी संख्येत कायम राहिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडे चारशेपार झाली आहे.

शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात ही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. रविवारी रात्रीपर्यंत 14 कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण पॉझिटीव्ह आले आले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी नायगाव, बिलोली व देगलूर येथे तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सांयकाळी टप्या-टप्याने आलेल्या अहवाल सात रुग्णांचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 447 झाली आहे.

आज आलेल्या 10 रुग्णांमध्ये एकटया बिलोली तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे.त्यांतर नांदेड तालुका एक, मुखेड 2, हिंगोली एक व नायगाव येथील एक रुग्ण आहे. यामध्ये नऊ पुरुष व एक महिलेचा समावेश आहे. तसेच सोमवारी 13 रुग्णांना कोरोनावर मात केल्याप्रकरणी डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोरोनावर मात करून घरी परलेल्या रुग्णांची संख्या 334 झाली आहे. तर उपचार घेणारे रुग्ण 88 आहेत.

सोमवारच्या रुग्णांचा तपशीलवार

पत्ता————-स्त्री/पुरुष———वय
1)नायगाव———-पुरुष———-54
2) मुखेड———–पुरुष———-65
3)देगलूर———–पुरुष———-35
4)मुखेड———–पुरुष———-74
5)हिंगोली———पुरुष———–22
6)चिंचाळा(बिलोली)-पुरुष———–35
7)आरळी(बिलोली)-पुरुष————43
8)गांधीनगर(बिलोली)-पुरुष———–38
9) गांधीनगर(बिलोली)-पुरुष———–52
10)बळीरामपुर-ता.नांदेड–पुरुष———60