कोरोनाचे धक्यावर धक्के सुरु; एकूण रुग्णसंख्या सव्वा तेराशे

नांदेड

 

नांदेड,बातमी24: शनिवारीनंतर कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे धक्के बसणे सुरूच आहे.रविवारी 72 रुग्ण वाढले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1 हजार 324 एवढी झाली आहे.

जिल्ह्यातील 243 नमुने तपासण्यात आले.यामध्ये 169 नमूने निगेटिव्ह आले, तर 72 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.आतापर्यंतची कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 324 झाली आहे.

रविवारी कोरोना झालेल्यापैकी 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.एकूण रुग्णसंख्या 693 झाली आहे,तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 562 झाली आहे. तसेच भोकर येथील मोहमद नगर येथील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू नांदेडच्या शासकीय रुग्णलयात मृत्यू झाला.त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 57 झाली आहे.