कोरोनाने घेतला सतरावा बळी; पुन्हा दोन रुग्णांची वाढ

नांदेड

नांदेड, बातमी 24ः– सायंकाळनंतर पुन्हा दोन रुग्ण वाढले, तर कौठा भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे दगावणारांची संख्या 17 झाली, असून रुग्णसंख्या 373 वर पोहचली आहे.

सोमवार दि. 29 रोजी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर चार रुग्ण वाढले होते. यानंतर पुन्हा 11 नमून्यांचा अहवाल घेण्यात आला. यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. यामध्ये शिवाजी नगर भागातील 32 वर्षीय महिला व छत्रपती चौक भागातील 57 वर्षीय इसमाचा समावेश आहे.

नवा कौठा भागातील बिग बाजार जवळ राहणार्‍या 53 वर्षीय पुरुषाचा सोमवारी सांयकाळी मृत्यू झाला. या पुरुषास 27 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तर दि.28 जून रोजी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत मरणारांची संख्या 17 झाली आहे. तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या 373 तर उपचार घेणारे रुग्ण हे 76 झाले आहेेत.