नांदेड,बातमी24:जिल्हा परिषद कर्मचारी हे कार्यालयीन वेळेबाबत घर की खेती सारखे जाऊ तेव्हा काम करू या अलिखित नियमाला नव्या सीईओ मिनल करनवाल यांनी लगाम लावला,असून 75 कर्मचाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर सर्व कर्मचारी हे अलर्ट झाले असून कारवाईच्या धास्तीपोटी सर्व कर्मचारी वेळेत कार्यालयात येत असल्याचे शुक्रवारपासून बघायला मिळाले.
जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासून त्या स्वतः सव्वा दहा वाजेपर्यत येत असतात.त्या स्वतः वेळेत येत असल्याने इतर कर्मचारी वेळा पाळत नसल्याची बाब समोर आली.याच आठवड्यात त्यांनी लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तंबी दिली.सोबत वेळा पाळा अन्यथा करणे द्यावे लागतील,अशी ताकीद दिली होती.
मागच्या दोन ते तीन दिवसात वेळेत दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्या एकूण 75 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा यावरून कर्मचाऱ्यांनी वेळेत येणे बरे,हे धोरण राबविल्याचे बघायला मिळाले.त्यामुळे शुक्रवारी सर्व कर्मचारी वेळेत विविध विभागात आपल्या खुर्चीवर होते.कर्मचाऱ्यांनी वेळा पाळाव्या,नियमित कामे करावी,व जनतेला सेवा द्याव्यात असे आवाहन सीईओ मिनल करनवाल यांनी केले.