ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यम शाळा क्रांतिकारी पाऊल ठरेल:-सभापती बेळगे

नांदेड

नांदेड,बातमी24:- माहिती तंत्रज्ञान व जागतिकीकरण ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकला पाहिजे,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने तालुका स्तरावर इंग्रजी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली.

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा नुकतीच झाली, या सभेत शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षणाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले,की जग हे झपाट्याने बदलत चालले आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना मराठी माध्यमासह इंग्रजी माध्यमाची गोडी लागली पाहिजे,यासाठी तालुकास्तरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले जावेत,असा मानस यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला होता.

अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने ठराव मांडला असल्याचे संजय बेळगे यांनी सांगितले,असून या ठरावास सभापती रामराव नाईक व जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांचे अनुमोदन देण्यात आले.त्यानुसार ठरावाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असून शासन इंग्रजी माध्यमाच्या शाळासाठी मान्यता देईल असा विश्वास संजय बेळगे यांनी व्यक्त केला.