हर घर नल से जल योजना प्रत्येक घराला मिळवून देणार पाणी-सीईओ वर्षा ठाकुर

नांदेड

नांदेड, बातमी24ः- हर घर नल से जल ही केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी योजना महत्वकांशी कार्यक्रमाचा भाग ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लाखो थेट नळ जोडणीच्या माध्यमातून घरांमध्ये पाणी मिळणार आहेे, ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदकडून काटेकोरेपणे अंअलबजावणी केली जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी सांगितले.

हर घर नल से जल योजना शासनाने दि. 20 जून 2020 रोजी सुरु केली आहे. यासाठी नळ जोडणीचे दर सुद्धा निश्चित केले आहेत. रोड क्रॉस नळ जोडणी असेल ततर 2 हजार 668 रुपये तर विना क्रॉस रोडसाठी 1 हजार 721 रुपये शासन देत आहे. तसे पाहता नांदेड जिल्ह्यात कुटुंब संख्या 5 लाख इतकी आहे. यात यापूर्वी 1 लाख 09 हजार घरांना जोडणी दिली आहे. तर चालू वर्षांमध्ये 62 टक्के म्हूणन 38 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी 2020- 21 या वर्षांमध्ये 1 लाख 66 हजार 792 नळ जोडणीचे उद्दिष्ट असल्याचे वर्षा ठाकुर यांनी कळविले आहे.

ही योजना सन 2024 पर्यंत चालणार असून 5 लाख 4 हजार 512 कुटुंबियांपर्यंत नळ जोडणीचे कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. या योजनेच्या प्रगतीचा अहवाल पाहिला असता, नांदेड जिल्हा राज्यात 23 व्या क्रमांकावर आहे. या योजनेसाठी अडीच कोटी रुपये प्राप्त झालेले, असून प्रशासनाने शासनाकडे 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संजय बावीस्कर यांनी सांगितले.
—–
या योजनेच्या कामात नांदेड जिल्ह्यात टॉप पाच जिल्ह्यांमध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. प्रत्येक घरी नळाला पाणी बघायला मिळेल, असा विश्वास सीईओ वर्षा ठाकुर यांनी व्यक्त केला.