नांदेड,बातमी24:-लोहा तहसील कार्यालयाच्या इमारतींवर उमरा येथील शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि.3 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
लोहा तालुक्यातील उमरा येथील 43 वर्षीय शेतकरी भीमराव चंपती सिरसाठ हे मागच्या काही दिवसांपासून कर्जबाजारी झाल्याने हतबल होते. यातून भीमराव सिरसाट यांनी तहसील कार्यालय इमारतीवर जाऊन गळफास लावून घेत जीवन यात्रा संपविली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची डायरी, मोबाईल घटनास्थळी मिळून आला.
यावेळी लोहा तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी ही घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली
यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे नातेवाईक, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व मोठा जमाव जमला होता. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी यावेळी जमावाने केली .
लोहा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
यावेळी घटना स्थळी उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर ,डीवायएसपी किशोर कांबळे, यांनी भेट दिली.
तसेच लोहा पं.स.चे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर , संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव, गजानन पाटील चव्हाण ,छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली गिते , धर्मवीर शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब पाटील जाधव , आदी ने भेट देऊन आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मागणी केली.