नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी कोरोना लसीकरण अभियानासाठी नवनवे उपक्रम राबवित असून मिशन कवचकुंडल अंर्तगत जिल्हा पातळीवर व्यापक मोहीम चालविली, या मोहिमेत सीईओ वर्षा ठाकूर यांनी ग्रामीण भागांना भेटी देऊन गावकऱ्यांशी संवाद साधत लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
मिशन कवच कुंडल अखंड covid-19 लसीकरण मोहीम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळा तालुका मुखेड येथे वर्षा ठाकूर घुगे यांनी भेट दिली.या भेटीत मिशन कवच-कुंडल मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य, शिक्षण, महसूल, पंचायत, आयसीडीएस, या सर्व विभागाचे प्रमुख, कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
त्याच सोबत सलगरा तालुका मुखेड येथे लसीकरण सत्रास मा.वर्षा ठाकूर,डॉ.बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी भेट देऊन आढावा घेतला.
कोविड-१९ लसीकरणाची मोहीम नांदेड सतत ७५ तास कोविड-१९ लसीकारणात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग विविध फंडे वापरून जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. लस न घेतलेल्या नागरीकांचे धान्य वाटप बंद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय येथे लस घेतल्या शिवाय प्रवेश नाही. कोविड-१९ लस घेतली असेल तरच बोला? आता पर्यंत रॅली, पोस्टर,बॅनर, होर्डिंग्ज,रेडिओ झिंगलस व चित्ररथाद्वारे जिल्हाभर प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. जिल्ह्यातील शंभर टक्के प्रौढ लोकसंख्येच्या लसीकरणाचे लक्ष पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा घरोघरी जाऊन लोकाना लसीकरणा साठी मत परिवर्तन करीत आहेत.
चौकट
आता पर्यंत नांदेड जिल्ह्यात झालेल्या कोविड-१९ लसीकरणाची आकडेवारी
ग्रामीण भागाचे काम – १३,७७,५३३.
शहरी भागाचे काम – २,81,५१४.
मनपा चे झालेले काम- 3,३१,२१०.
नांदेड जिल्ह्याचे एकूण काम- १९,९०,२३७.