टाळेबंदीबाबत शासनाचे नवे आदेश;अफवांवर विश्वास ठेवू नका:-डॉ.इटनकर

नांदेड

नांदेड,बातमी24:- राज्य शासनाने टाळेबंदीबाबत नव्याने आदेश काढले असून दि.5 ते 15 एप्रिल या दरम्यान सायंकाळी 8 ते सकाळी सात वाजेपर्यत संचारबंदी असणार आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यात दि.5 ते 15 पर्यंत टाळेबंदी असेल अशी अफवा केली जात आहे,यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

या दरम्यानच्या काळात नागरिकांना खासगी असो की सार्वजनिक कामाचे ठिकाणी मास्क घालणे आवश्यक असणार आहे,दोन माणसांमध्ये सहा फुटाचे अंतर राखणे महत्वाचे ठरणार आहे.दुकानांमध्ये ही सामाजिक अंतर पाळावे लागेल,त्याठिकाणी सॅनिटायझर,ताप मोजण्याची मशीन आदी बाबी असणे अनिवार्य असणार आहे.

यापूर्वी नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी काढलेले आदेश हे पूर्णतः 4 एप्रिलपर्यंत जशास तसे लागू राहणार आहे,यात कुठला ही बदल असणार नाही,असे सांगण्यात आले आहे,त्यामुळे दि.5 ते 15 या दरम्यान लॉकडाउन नसणार नाही,उलट रात्रीचे आठ व सकाळी सात वाजेपर्यत संचारबंदी असनार आहे. एका प्रकारे शासनाची ही बाब सर्वांसाठी दिलासादायक असनार आहे.