जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या निर्णयामुळे मानकऱ्यांचा सन्मान

नांदेड

नांदेड,बातमी24:- भारतातील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही होण्याची शक्यता कमी आहे.यात्रा यावेळी होऊ अथवा न होवो मात्र माळेगाव येथील मानकऱ्यांना यावर्षी पासून प्रत्येकी मानकरी यांना 51 हजार रुपये देऊन मानसन्मान केला जाणार आहे.मानकऱ्यांचा सन्मान करणाऱ्या मंगाराणी अंबुलगेकर पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्ष ठरल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत मानकरी यांच्या मानधनाचा विषय जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी काढला होता.या विषयावर बोलताना मंगाराणी अंबुलगेकर म्हणाल्या,की माळेगाव यात्रा कोरोनाच्या नव्या विषाणूजन्य संसर्गामुळे जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाच्या अहवालानंतर याबाबत चर्चा होईल.परंतू मानकऱ्यांचा फक्त यापूर्वी शाल श्रीफळ व फेटा बांधून मान केला जात होता.मात्र यावर्षीपासून श्री क्षेत्र माळेगाव येथील मंदिर देवस्थान येथील जे मानकरी आहेत,त्या मानकऱ्यांना प्रत्येकी 51 हजार रुपये मानधन दिले जाईल,असे मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले.तसेच यात्रा कदाचित झाली नसेल तरी, जिल्हा परिषदेच्या वतीने विधिवत पूजा अर्चा केली जाणार असल्याचे अंबुलगेकर यांनी कळविले.