सुरक्षेच्या दृष्टीने माळेगाव यात्रेसाठी सीईओ करणवाल यांचे महत्वाचे पाऊल

नांदेड

नांदेड,बातमी24:- श्री क्षेत्र माळेगाव यात्रेची तयारी प्रशासकीय पातळीवर जोरदारपणे सुरू असून या दृष्टीने कुठे त्रुटी राहता कामा नये,यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहेत.यात्रेत वर्षी जिल्हा परिषदकडून महत्वाच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे, महत्वाच्या सूचना देण्यासाठी मोठे भोंगे तसेच मोबाईल टॉवर रेंज वाढविली जाणार आहे,यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट माळेगाव यात्रा होणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे तसेच जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी दिली.

श्री क्षेत्र माळेगाव यात्रेस दि.10 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.या यात्रेचे दायित्व अनेक वर्षांपासून नांदेड जिल्हा परिषदकडे असते. प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करून यात्रेची शोभा वाढविण्याचे जिल्हा परिषदकडून केले जाते. या यात्रेला लोकाश्रेय जिल्हा परिषद तत्कालीन अध्यक्ष राहिलेल्या दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी मिळवून दिला.त्याच्या काळात भरघोष निधी यात्रेला उपलब्ध झाला.लावणी व तमाशा महोत्सव सुद्धा त्यांच्या काळात सुरू झाला.

मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक असून गतवर्षी तत्कालीन सीईओ वर्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनात यात्रा भरविली गेली. तर सर्व यात्रेची जबाबदारी गतवर्षी प्रभारी सीईओ म्हणून संदीप माळोदे यांनी पूर्णत्वास नेली.

यावर्षीची माळेगाव यात्रा ही नवा भिडू नवा राज याप्रमाणे थेट आयएएस अधिकारी मीनल करणवाल यांच्या नेतृत्वाखाली होत असून यात्रेत आपण काही तरी वेगळं केलं पाहिजे, या दृष्टीने व्यहरचना आखली जात आहे. त्याचाच एक भाग पाहता, यापूर्वी माळेगाव यात्रेत सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत,जेणेकरून कुठे अनुचित प्रकार घडू नये,रुग्णवाहिका,अग्निशमन वाहने सुद्धा तैनात असतील कधी काही सूचना असतील तर भोंगे लावून कळविणे,तसेच माळेगाव यात्रेत मोबाईल रेंज सर्वांत मोठी डोकेदुखी असते.त्यामुळे मोबाईल रेंज वाढविण्याच्या सूचना सीईओ मीनल करणवाल यांना दिल्याची माहिती संदीप माळोदे व मंजूषा कापसे यांनी दिली.