264 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू

नांदेड

नांदेड, बातमी24: जिल्ह्यात 264 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. तर आठ जणांच्या मृत्यूची सुद्धा नोंद झाली आहे.

आजच्या एकुण 1 हजार 70 अहवालापैकी 751 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 12 हजार 701 एवढी झाली असून यातील 8 हजार 480 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.सध्या 3 हजार 818 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 42 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

8 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवार 9 सप्टेंबर रोजी माहूर तालुक्यातील करंजी येथील 62 वर्षाच्या एका महिलेचा, नांदेड दत्तनगर येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात, गुरुवार 10 सप्टेंबर रोजी बालाजीनगर नांदेड येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, बुधवार 16 सप्टेंबर रोजी धर्माबाद तालुक्यातील यताळा येथील 20 वर्षाची एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, मुदखेड येथील 55 वर्षाची एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, नांदेड विशालनगर येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, चौफाळा नांदेड येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा यांचा खाजगी रुग्णालयात, गुरुवार 17 सप्टेंबर रोजी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील 50 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 338 झाली आहे.