नांदेड, बातमी24ः कोरोनाची आकडेवारी ही सेनसेक्सप्रमाणे झाले आहे. मागच्या दोन दिवसांच तुलनेत सोमवारी कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत घट झाली. मात्र मृत्यूचा आकडा तीन वाढला आहे.
सोमवारी आलेल्या आकडेवारीनुसार 332 नमूने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 223 नमूने हे निगेटीव्ह आले असून 51 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 986 इतकी झाली, असून ही आकडेवारी जवळपास एक हजारापर्यंत आली आहे. त्याचसोबत 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे 515 झाले आहेत. तर उपचार घेणार्या रुग्णांची संख्या 423 आहे. आज आलेले बहुतांशी रुग्ण हे नांदेड शहरातील आहेत.
——
तिघांचा मृत्यू
हिंगोली नाका येथील 64 वर्षीय महिलेचा,दि. 20 रोजी नायगाव येथील 26 वर्षीय महिलेचा तसेच देगलूर नाका येथील 65 वर्षीय इसमाचा कोरोना मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 42 रुग्ण हे नांदेड जिल्ह्यातील तर 7 रुग्ण हे इतर जिल्ह्यातील असून एकूण मृत्यू संख्या 49 झाली आहे.