नांदेड,बातमी24:-मागच्या 24 तासात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढत असल्याने चिंतेचे ढग पुन्हा दाटून आले आहेत.
नांदेड जिल्ह्यात 27 जुलैपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 60 झाली होती. गत चौविस तासा कंधार तालुक्यातील बारुळ येथील 50 वर्षीय इसमाचा 27 रोजी सायंकाळी मृत्यू झाला. या मयतास 26 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
किनवट येथील 70 वर्षीय महिलेचा 27 रोजी मृत्यू झाला.मुदखेड येथील 70 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. भोकर रिठा येथील 57 वर्षीय मृत्यू झाला तसेच नांदेड शहरातील वजीराबाद येथील एका वयस्क इसमाचा मृत्यू झाला,त्यांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत 65 जण दगावल्याचे सांगण्यात येते,.