नांदेड,बातमी24ः-राज्य परिवहन महामंडळाची एसटी प्रवासी वाहतूक आणि सर्व महानगरांमधील सार्वजनिक वाहतूक सेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, या मागणीकडे वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करून लक्ष वेधून घेतले. या वेळी राज्यभरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी डफली बजाओ आंदोलन परिवहन महामंडळाच्या कार्यालयासमोर करण्यात आले.
नांदेड येथे एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
वंचित बहुजन आघाडी तर्फे यावेळी एस. टी. महामंडळ विभागीय नियंत्रक तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना लेखी निवेदन देण्यात आले. एसटी बसेस आणि सर्व शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुरू करून जनजीवन पूर्वपदावर आणणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, ही भूमिका निवेदनाद्वारे प्रशासनाच्या कानी घालण्यात आली.
आंदोलनात भदंत पैंय्याबोधी नांदेड उत्तरचे शहराध्यक्ष आयुबखान, महासचिव श्याम कांबळे (दक्षिण), विठ्ठल गायकवाड, साहेबराव बेळे, चंद्रकला चापलकर, रेणुकाताई दिपके, रामचंद्र सातव, अशोक कापशीकर, उमेश ढवळे, डॉ. संघरत्न कुर्हे, के. एच. वने, प्रतीक मोरे, संजय निवडूंगे, पद्माकर सोनकांबळे, कौशल्याबाई रणवीर, संदीप वने, केशव कांबळे, कैलास वाघमारे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.