नववी ते बारावी शाळा सुरू होणार;पहिली ते आठवीकरिता करावी लागणार वेट अँड वॉच

नांदेड

 

नांदेड, बातमी24:- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम सौम्य स्वरूपात असल्याने संसर्ग प्रसार अधिक असला,तरी जीवितहानी नसल्याने राज्य शासनाने शाळा बाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे.त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग दि.24 जानेवारीपासून पुन्हा भरणार आहेत. मात्र पहिली ते आठवीपर्यत विध्यार्थ्यांना व पालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता,यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हिरवाकंदिल दाखविला होता.त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पत्र काढले.यात नववी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.मात्र पहिली ते आठवीपर्यतचे वर्ग सुरू करण्याबाबत शहरी भागाविषयी मनपा आयुक्त व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषद सीईओ यांना कोरोना परिस्थिती आढावा घेऊन घ्यायचा आहे.असे पत्रात कळविले आहे.