मंगळवारी रुग्णांची संख्या दीडशेपार तर सहा जणांचा मृत्यू

नांदेड

नांदेड, बातमी24ः सोमवारी कोरोनाच्या रुग्ण संख्या व मृत्यूचा आकडा शुन्य असल्याने दिलासादायक बाब ठरली होती. मात्र मंगळवारी कोरोनाची संख्या पुन्हा दीडशेपार गेली आहे. तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.तर 130 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागच्या चौविस तासांमध्ये 1 हजार 516 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 1 हजार 322 जणांचा अहवाल कोरोना निगेटीव्ह तर 162 जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 3 हजार 518 इतकी झाली आहे. यामध्ये आरटी-पीसीआर चाचणीत 44 तर अंटीजन चाचणीत 118 जण पॉझिटीव्ह असे एकूण मिळून 162 जणांचा समावेश आहे.

दिवसभराच्या काळात 130 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आतापर्यंत 1 हजार 909 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 1 हजार 465 जण उपचार घेत आहेत. यातील 115 जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच दि. 11 ऑगस्टच्या प्रेसनोटमध्ये 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये उमरी तालुक्यातील कवलगुंडा येलि 50 पुरुषाचा दि. 6 रोजी, तरोडा भागातील दीपनगर येथील 76 वर्षीय 10 ऑगस्ट, नांदेड येथील खुसरो नगर येथील 70 वर्षीय पुरुषाचा दि. 10 रोजी, देगलूर तालुक्यातील करडखेड येथील 70 वर्षीय महिलेचा दि. 9 रोजी, हिमायतनगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि. 11 रोजी तसेच नांदेड येथील किल्ला रोड येथील 65 वर्षीय इसमाचा दि. 11 रोजी मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 126 झाली आहे.

आज आलेल्या चाचणीमध्ये 52 रुग्ण हे नांदेड मनपा हद्दीमधील पॉझिटीव्ह आले आहेत. देगलूर तालुक्यातील 41 तर बिलोली तालुक्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे. इतर तालुक्यातील एकेरी संख्या आहे.