मयत अक्षय भालेराव कुटुंबियास आंबेडकरवादी मिशनची एक लाख रुपयांची मदत

नांदेड

नांदेड नगरी,बातमी24:- बोंडार हवेली येथील समाजकंटकांनी आंबेडकरी समाजाचा युवक अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृण हत्या केली. या घटनेची महाराष्ट्रात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या घटनेचे सामाजिक भान राखत आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी बोंडार हवेली येथे जाऊन भालेराव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मिशनच्या वतीने एक लाख रुपयांची मदत प्रदान करण्यात आली.

दोषी आरोपींना कायदेशीर शिक्षा व्हावी,यासाठी मिशन आपले योगदान देईल,असे आश्वासन दीपक कदम यांनी भालेराव कुटुंबियांना दिले.या प्रकरणी कदम यांनी जिल्हाधिकारी पी.बोरगावकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी न्या.सी.एल.थुल यांची प्रमुख उपस्थिती होती.राज्यभरातील नामांकित वकील या प्रकरणी लक्ष घालून आरोपींना कडक शासन कसे होईल,यासाठी लढा देतील, असे न्या.थुल यांनी सांगितले.

याप्रसंगी अॅड. अश्विन थुल, माजी जिल्हा न्यायाधीश आर. वी कोकरे, माजी न्या. एल. एन.देवकरे, प्रकाश टोम्पे, ज्योती चंदनशिवे, संदीप डोंगरे, मच्छिंद्र गवाले, भीमराव हटकर, तेन हिलकरएस बी, राजेंद्र ताटे, डी. एन. भालेराव, एच. बी. हटकर, रविकुमार लाभदे, एस. पी. कांबळे, एस. बी. धबाले, एल. आर. साबळे, बेळगावकर शिरसाट मेश्राम, चंद्रबोडी, प्रशिक गायकवाड तोफीक शेख, राहुल शेळके, प्रशिक गायकवाड, सिद्धार्थ सोनवणे, ठाणे, धम्मा टोम्पेस,संदीप गजभारे यांच्यासह मुंबई, परभणी नांदेड, हिंगोली येथून आलेले वरिष्ठ वकील मंडळीची प्रामुख्याने उपस्थिती होती.