कोरोनाचा प्रकोप; मागच्या चौविस तासात दहा जणांचा बळी; रुग्णसंख्या सवाशे पार

नांदेड

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हयात मंगळवारी कोरोनाच्या मृत्यू व रुग्ण संख्येने सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. मागच्या चौवित तासात 10 जणांचा मृत्यू तर 134 नवे रुग्ण सापडले आहेत. अचानक वाढलेल्या कोरोनाच्या रुग्ण संख्या व मृत्यूचा आकडा नागरिकांचा चक्रावरून टाकणारा आहे.

मंगळवार दि. 28 जुलै रोजी 284 नमूने तपासण्यात आले. यामध्ये केवळ 89 अहवाल निगेटीव्ह आले तर नव्याने 134 रुग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत निगेटीव्ह अहवालाची संख्या सर्वाधिक राहत असत. मात्र या वेळी निगेटीव्ह अहवाल सर्वात कमी असून पॉझिटीव्ह असणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरेानाच्या रुग्णसंख्येने एक हजार 528 आकडा पार केला आहे.

रुग्णांचा आकडा जसा वाढला, तसेच एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यूची नोंद मंगळवारी झाली, असून मागच्या चौविस तासांमध्ये जणांना कोरोनामुळे स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 70 झाली आहे. 677 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून त्यातील 11 रुग्ण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. तसेच 30 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील पंजाब भवन येथील 21, लोहा कोविड केअर सेेंटर येथील 7 व औरंगाबाद संदर्भीत 2 रुग्ण आहेत.
—–
सूचनाः यासंबंधीची वृत्त थोडयाच वेळात विस्ताराने