नांदेड,बातमी24ः कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारातून सावरण्यासाठी प्लाझमा थेरपी महत्वाची मानली जाते. सदरची उपचार पद्धती नांदेड येथे नव्हतती. यासंबंधीची उपचार पद्धती डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारपासून सुरु झाली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मध्यम स्वरुपाच्या रुग्णांवर प्लाझमा थेरपीने उपचार व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरु होते.या प्रयत्नाला शनिवारपासून मुर्त स्वरुप आले आहे. या वेळी दोन रुग्णांना प्लाझमा (रक्त) चढविण्यात आले. या वेळी डॉ.धोडिंबा भुरके, डॉ. शीतल राठोड, डॉ. समीर, डॉ. संज्योती गिरी यांची उपस्थिती होती.