नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे.मंगळवार दि.20 रोजी 1 हजार 157 रुग्ण सापडले आहेत.तर 25 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
मागच्या 24 तासांमध्ये 4 हजार 287 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 1 हजार 157 जण बाधित आले.यातील मनपा हद्दीत 528 तर ग्रामीण भागात 612 जणांचा समावेश आहे.जिफ्यात8 एकूण बाधित झालेले 70 हजार 419 यातील उपचाराअंती 54 हजार 761 बरे झाले.आज बरे झालेले रुग्ण हे1 हजार 15 इतके आहेत.
——–
25 जणांचा मृत्यू
मागच्या तीन दिवसांमध्ये 25 जणांचा उपचार सूरु असताना मृत्यू झाला आहे.यात आठ महिला व 17 पुरुषाचा समावेश आहे.